Advertisement

अनलॉकच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ

लॉकडाऊनच्या काळात अगदीच ठप्प पडलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीने शिथिलीकरणानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये देशभरातच उसळी घेतली आहे.

अनलॉकच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन (lockdown) करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं खासगी वाहतूक (electric vehicle) बंद ठेवण्यात आली होती. तसंच, काही काळानंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली. पण या काळात नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीऐवजी (public transport) स्वतःच्या मालकीच्या वाहनांना पसंती दिली आहे. तसंच, स्वत:चे वाहन घेण्याचा कल वाढत असताना त्याचा फायदा पर्यावरणपूरक दुचाकी वाहनांना होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात अगदीच ठप्प पडलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीने शिथिलीकरणानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये देशभरातच उसळी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात २,५४४ विजेवरील दुचाकींची विक्री झाली असून ही वाढ गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ७२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच सुमारास १४७३ विजेवरील दुचाकींची विक्री झाली होती.

लॉकडाऊनचा मोठा फटका विजेवरील वाहनांच्या उद्योगाला बसला होता. एप्रिल महिन्यात देशभरात विजेवरील ६७ दुचाकींची विक्री झाली. मात्र आता विक्रीत वाढ झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विक्रीत ३३ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ७२ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये १,७९३ विजेवरील दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती १,३४३ होती. पर्यावरणाबाबत जागरूक असणारे नागरिक आणि युवा वर्गाकडून विजेवरील वाहनांना मागणी आहे. 



हेही वाचा - 

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा