आरेतील मूलभूत सुविधांसाठी उपोषण

 Goregaon
आरेतील मूलभूत सुविधांसाठी उपोषण
आरेतील मूलभूत सुविधांसाठी उपोषण
See all

गोरेगाव - आरे कॉलनीतील मूलभूत सुविधा बंद केल्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नवक्षितीज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुबरे यांच्यासह जयराम कदम, रवि जाधव, बरकत शेख हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. झोपड्या दुरूस्ती, शौचालय, लाईट मिटर बसवणे अशा अनेक मूलभूत मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला आरेतील रहिवासी संघाने लेखी स्वरूपात ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडे पाठिंबा दर्शवलाय.

Loading Comments