... म्हणून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी साजरा होतो


SHARE

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जन सरसावतील. या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असं सांगतील. पण, १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक आहे


अशी झाली सुरुवात

औद्योगिक क्रांतीनंतर त्याकाळी जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. कामगारांकडे काम होतं. मात्र त्यांची पिळवणूक सुरू होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे. रविवारची सुट्टी देखील नव्हती. याविरोधात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार एकजूट झाले. महालक्ष्मी रेसकोर्सवर सर्व कामगारांनी एकत्र येत मोठा उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास आणि रविवारची सुट्टी निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन आंतराष्ट्रीय परिषदा पार पडल्या. त्यानंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला.


संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा

महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे. संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेली भूमिका अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खऱ्या अर्थानं रस्त्यारस्त्यात लढला गेला. २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसे चिडला होता. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचं नियोजन झालं.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूनं चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले.


कामगारांची भूमिका

या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अधिक तीव्र झालं. उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीनं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कामगारांनी चांगला प्रतिसाद दिला. याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.
संबंधित विषय
ताज्या बातम्या