Advertisement

पहिल्या महिला भारतीय डॉ. रखमाबाई यांना गुगलद्वारे मानवंदना


पहिल्या महिला भारतीय डॉ. रखमाबाई यांना गुगलद्वारे मानवंदना
SHARES

पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या 153 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.


मुंबईत झाला जन्म

रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी झाला. रखमाबाई यांच्या आई जयंतीबाई यांचाही विवाह वयाच्या 14 व्या वर्षी झाला होता. रखमाबाई दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आई जयंतीबाई यांनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरा विवाह केला.


ब्रिटीश काळातील पहिल्या महिला डॉक्टर

ते काळ ब्रिटीशांचे होते. त्यावेळी भारतात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते. प्रत्येक परिस्थितीशी लढा देत त्यांनी शिखर गाठले. रखमाबाई राऊत या रुक्माबाई नावानेही ओळखल्या जात. बालवयातच लग्न झालेल्या रखमाबाई यांनी पतीसोबत न राहता आपल्या माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या ब्रिटीश काळातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांनी फक्त रुग्णांची सेवाच केली नाही, तर भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही लढल्या. बालविवाह प्रथा बंद पाडण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.


त्या न्यायालयीन लढाई लढल्या

त्यांचे पती दादाजी यांना फक्त रखमाबाईंच्या पैशात रस होता. त्यामुळे त्या आपल्या पतीसोबत राहात नव्हत्या. त्यांच्या आई जयंतीबाई यांनी सर्व मालमत्ता रखमाबाई यांच्या नावे केली होती. पण जयंतीबाईंच्या निधनानंतर पैशाच्या मोहापाई रखमाबाईं यांचे पती दादाजी यांनी 1884 मध्ये मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी रखमाबाईंसमोर पेच निर्माण झाला होता. कारण कोर्टाने त्यांना पतीसोबत राहा अन्यथा तुरुंगात जावे लागेल अशी तंबी दिली होती. त्यावेळी रखमाबाईंनी तुरुंगात जाईन पण पतीसोबत राहणार नाही असा निर्णय घेत न्यायालयीन लढाई लढल्या आणि 1988 दादाजींकडून घटस्फोट घेतला.


91 व्या वर्षी निधन

पुढे त्यांनी बालविवाह प्रथा मोडून काढण्यासाठीही न्यायालयीन लढाई लढली. अखेर त्यांना न्याय मिळाला. 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट अस्तित्त्वात आला. महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या रखमाबाई यांचे 19 सप्टेंबर 1955 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.


अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या रखमाबाई यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा निर्मात्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच मराठीत त्यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करण्यात आला. यामध्ये तनिषा चॅटर्जी यांनी रखमाबाईंची भूमिका साकारली आहे. याचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले.    


रखमाबाई या बायोपिकचे टिझर


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा