Advertisement

आता रिसायकलिंग वेस्टच्या बदल्यात मिळवा गिफ्ट!

इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने कपडे, खेळणी या वस्तू घरात पडून असतात. मग अशा वस्तूंचं नक्की करायचं काय? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर ग्रीन यात्रा या संस्थेनं दिलं आहे.

आता रिसायकलिंग वेस्टच्या बदल्यात मिळवा गिफ्ट!
SHARES

तुमच्या घरातील टाकाऊ वस्तूचं तुम्ही काय करता? धूळखात घरातल्या एका कोपऱ्यात पडलेल्या असतील ना? घरात अशा किती तरी वस्तू असतात, ज्या वापरात नसतात. जसं की, कुठली तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने कपडे, खेळणी या वस्तू घरात पडून असतात. मग अशा वस्तूंचं नक्की करायचं काय? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर ग्रीन यात्रा या संस्थेनं दिलं आहे.


घरातल्या टाकाऊ वस्तूंचं काय कराल?

ग्रीन यात्रा ही संस्था पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवते. अशाच एका नवीन उपक्रमांतर्गत ग्रीन यात्रानं 100 टन पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा कचरा गोळा केला आहे.

या संकल्पनेअंतर्गत तुम्हाला फक्त घरातील असा कचरा ग्रीन यात्रा या संस्थेतल्या सदस्यांना द्यायचा आहे आणि त्याबदल्यात तुम्हाला एक बॅग दिली जाणार. ‘बॅग फॉर कॉज’ असं त्यांच्या उपक्रमाचं नाव आहे. 13 मार्चपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.



आत्तापर्यंत या संस्थेनं अशा कचऱ्याच्या बदल्यात 20 हजार बॅगा दिल्या आहेत. या उक्रमामुळे आदिवासी पाड्यातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलांनी बनवलेल्या बॅगेमध्ये जवळपास 15 किलो वजनाचं सामान राहू शकतं. 2012 पासून ठाण्यातल्या आदिवासी भागांमध्ये या बॅग्स बनवल्या जातात. 2018 पर्यंत वाडा, जवाहर, डहाणू, कल्याण आणि कर्जतमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा मानस असल्याची माहिती ग्रीन यात्राचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी यांनी दिली.



ग्रीन यात्रा या संस्थेत सध्या 20 सदस्य आहेत. या सदस्यांनी एकत्र येत ग्रीन यात्रा ही संस्था स्थापन केली. पर्यावरण संवर्धनासाठी या संस्थेनं वृक्षारोपण उपक्रम देखील राबवला आहे. 2010 पासून ही संस्था आरेमधल्या 19 आणि 22 या युनिटमध्ये वृक्षारोपण करत आहे. याशिवाय मालाड, गोराई, वसई, भाईंदरसारख्या परिसरांमध्ये या संस्थेनं आंबा, चिकू, पेरू, डाळिंब अशा फळबागा तयार केल्या आहेत. आत्तापर्यंत या संस्थेतर्फे 1 लाखाहून अधिक वृक्षांची लागवड केली गेली आहे.



हेही वाचा

'त्या' ९०० मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या पोलिस अधिकारी!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा