Advertisement

'त्या' ९०० मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या पोलिस अधिकारी!

रेखा मिश्रा यांनी २൦१६ मध्ये ४३४ हरवलेल्या आणि पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना अगदी सुखरुपपणे त्यांच्या घरच्यांकडे सुपूर्द केलं आहे. या ४३४ लहान मुलांमध्ये ४५ मुली आणि ३८९ मुलं होती. ही मुलं १൦ ते १६ या वयोगटातील होती. तर, २०१७ मध्ये रेखा यांनी ५०० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरी परत पाठवलं आहे. दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ९०० पेक्षा अधिक लहान मुलांना त्यांच्या घरी परत पाठवलं आहे.

'त्या' ९०० मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या पोलिस अधिकारी!
SHARES

मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात सर्वांनाच आपलं नशीब आजमावायचं असतं. याच हेतूने अती उत्साहाच्या भरात शहराबाहेरील मुलं मुंबईत येतात. विशेष म्हणजे आपलं घरदार, आई-वडिलांना सोडून मुंबईत आलेली ही मुलं १൦ ते १६ वयोगटातील असतात. अशाच काही मुंबईत भटकणाऱ्या किंवा घरातून पळून आलेल्या १൦ ते १६ वयोगटातील छोट्या मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे पोलिस नेहमीच झटत असतात. त्यातीलच एक आहेत रेल्वे पोलिस फोर्समधील पोलिस उपनिरीक्षक रेखा मिश्रा. रेखा मिश्रा यांनी २൦१६ आणि २൦१७ या दोन वर्षांत घर सोडून मुंबईत पळून आलेल्या किंवा हरवलेल्या ९०० पेक्षा अधिक मुलांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं धडाडीचं काम केलं आहे.

रेखा मिश्रा यांनी २൦१६ मध्ये ४३४ हरवलेल्या आणि पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना अगदी सुखरुपपणे त्यांच्या घरच्यांकडे सुपूर्द केलं आहे. या ४३४ लहान मुलांमध्ये ४५ मुली आणि ३८९ मुलं होती. ही मुलं १൦ ते १६ या वयोगटातील होती. तर, २०१७ मध्ये रेखा यांनी ५०० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरी परत पाठवलं आहे. दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ९०० पेक्षा अधिक लहान मुलांना त्यांच्या घरी परत पाठवलं आहे.

ही सर्व मुलं अनेकदा आपल्या वाईट परिस्थितीला कंटाळून मुंबईत येतात. अमरावती किंवा बिहार अशा शहरांतून ही मुलं आलेली असतात. अनेकदा ग्रुपमध्ये ही मुलं आपल्या घरातून पळून येतात. आम्हाला ही मुलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सापडली आहेत. ही मुलं १൦ ते १६ या वयोगटातील असतात आणि सर्वात जास्त प्रमाण हे मुलांचं असतं.

रेखा मिश्रा, पोलिस उपनिरीक्षक, आरपीएफ

रेखा मिश्रा यांची २०१४ मध्ये छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे पोलिस फोर्समध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला रेखा यांना महिला सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. पण, नंतर त्यांच्या जबाबदारीत भर टाकत त्यांना महिला सुरक्षा आणि चाईल्ड वेल्फेअर ही जबाबदारी देखील दिली. रेखा या उत्तर प्रदेशच्या असून त्या त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या महिला पोलिस आहेत, ज्याचा त्यांना अभिमान आहे!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा