Advertisement

हो... मी बाहेर जाणारच!


SHARES

दादर - मुंबईतल्या तमाम तरुणींनी एकत्र येत नवीन मोहीम हाती घेतली आहे. दादरच्या वीर कोतवाल उद्यान परिसरात तरूणींनी शनिवारी 'आय विल गो आऊट' ही मोहीम राबवत आपला आक्रोश व्यक्त केला. अरे तिने छोटे कपडे घातले म्हणून तिच्यावर बलात्कार झाला. रात्री-अपरात्री फिरायची काय गरज? एवढ्या रात्री भटकत होती तर तिचा विनयभंगच होणार ना ! अशी वाक्य तुमच्या कानावर नेहमीच येत असतील. महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पण या घटनांमागे महिलांचे कपडे आणि रात्री-अपरात्री फिरणे याला जबाबदार धरले जाते. याविरोधातच काही महिलांनी 'आय विल गो आऊट' ही मोहीम सुरू केलीय. अनेक सामाजिक संस्था आणि सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून देशातल्या 30 शहरांमध्ये 'आय विल गो आऊट' ही मोहीम राबवली गेली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा