उपनगरातील पत्रकारांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

 Chembur
उपनगरातील पत्रकारांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
Chembur, Mumbai  -  

मुंबई उपनगर पत्रकार असोसिएशनच्या वतीने बुधवारी रमझान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनी येथील संत रोहिदास सभागृहात या निमित्त आरपीएफचे आय जी अतूल श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस उपायुक्त दीपक देवराज सहाय्यक पोलिस उपायुक्त दिनेश देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त भीमदेव राठोड, आमदार मंगेश कुडाळकर, नगरसेवक तथा पालिकेचे एम विभाग अध्यक्ष सुसम सावंत वरिष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते अफरोज मलिक यांची उपस्थिती होती. गेली 6 वर्षे पत्रकार असोसिएशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.

पत्रकारांचे सामाजिक योगदान चांगले असते त्यातून समाज चांगला आणि सदृढ होतो. यातून सामाजिक संदेश देण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. असे म्हणून पत्रकारांनी केलेल्या या इफ्तार पार्टीच कौतूक करत कुर्ल्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीच आयोजन केल्या जात यातून हिंदू मुस्लिम समजला एकतेचा संदेश दिला जातो, असे मत यावेळी शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी व्यक्त केले.

Loading Comments