Advertisement

ऐतिहासिक निर्णय! तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी, केंद्र सरकार कायदा करणार


ऐतिहासिक निर्णय! तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी, केंद्र सरकार कायदा करणार
SHARES

मुस्लिम धर्मातील तिहेरी तलाक पद्धतीला 6 महिन्यांपर्यंत स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या सहा महिन्यांत सरकारने संसदेत यावर कायदा करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

11 ते 18 मे पर्यंत तिहेरी तलाक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ज्यानंतर 22 अॉगस्टपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीशांनी तिहेरी तलाक पद्धतीला घटनाबाह्य ठरवत यावर बंदी घालावी असा निर्णय सुनावला. तसेच कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.


काय आहे निर्णय

  • आजपासून पुढील सहा महिने तिहेरी तलाकवर बंदी
  • सहा महिन्यांत केंद्र सरकार नवीन कायदा करणार
  • सहा महिन्यांत कायदा न आल्यास बंदी कायम रहाणार
  • नवीन कायदा होईपर्यंत तिहेरी तलाक पद्धतीवर बंदी
  • राजकीय पक्षांना कायद्यासाठी मदतीचं आवाहन
  • पाचपैकी तीन न्यायाधीशांचा तिहेरी तलाकला विरोध
  • दोन न्यायाधीशांचं तिहेरी तलाकच्या बाजूने मत

उत्तराखंडमधील सायरा बानो या महिलेने तिहेरी तलाक पद्धतीविरोधात याचिका दाखल केली होती. पण अखेर 22 ऑगस्टला याचिकाकर्त्यांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने  तलाक पद्धतीवर बंदीचा निर्णय दिला आहे.


या पाच न्यायाधीशांनी दिला निर्णय

  • सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख)
  • न्यायाधीश कुरियन जोसफ (ख्रिश्चन)
  • न्यायाधीश रोहिंग्टन एफ नरीमन (पारसी)
  • न्यायाधीश यूयू ललित (हिंदू)
  • न्यायाधीश अब्दुल नजीर (मुस्लिम)



हेही वाचा - 

केंद्र सरकारच्या तलाक सर्व्हेला विरोध

'या' मशिदीत महिलाही करतात कुराणाचे पठण


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा