केंद्र सरकारच्या तलाक सर्व्हेला विरोध

  Malad West
  केंद्र सरकारच्या तलाक सर्व्हेला विरोध
  मुंबई  -  

  मालवणी - केंद्र सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या तीन तलाक या ओपन सर्व्हेला मालवणी गेट क्रमांक 8 या मैदानात हजारोंच्या संख्येने जमलेल्या मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी विरोध केलाय. या वेळी उत्तर प्रदेशच्या बरेलीतून आलेले मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद अख्तर रजा खान अजहरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मुस्लीम समाजाच्या शरियत कायद्यात पंतप्रधान मोदींनी दखल देऊ नये, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही त्यांनी दिला. यासह देशाच्या सुरक्षेसाठी लागलेल्या एकूण व्यवस्थेपैकी 30 टक्के मुस्लिमांना दिल्यास लाहोर तर काय संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा होईल.

  तर दुसरीकडे तीन तलाक यावरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून मुस्लीम महिलांच्या हक्काविषयी सुरू केलेल्या या उघड सर्व्हेमुळे मुस्लीम समाजातील एक वर्ग नाराज झालाय. तर काँग्रेसने याला निवडणुकींचा रंग देत आमदार असलम शेख यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन निवडणुकीसाठी सरकारची ही खेळी असल्याचं म्हटलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.