Advertisement

International Womens day 2022 : पहिली शिकलेली मराठी महिला 'या' व्यवसायातून कमवतेय कोट्यावधी

पहिली शिकलेल्या महिलेनं ५ कोटींचा व्यवसाय स्वत:च्या हिमतीवर आणि मेहनतीवर उभारला आहे. महिला दिनानिमित्त जाणून घ्या त्यांचा प्रवास...

International Womens day 2022 : पहिली शिकलेली मराठी महिला 'या' व्यवसायातून कमवतेय कोट्यावधी
SHARES

आपल्या पारंपारिक खेकड्याच्या व्यवसायाला परदेशात पोहचवून नवी मुंबईचे नाव आंतरराष्टीय पातळीवर नेणार्‍या वाशी गावातील खेकड्याच्या मावशी म्हणजेच गुणाबाई सुतार... पहिली शिकलेल्या महिलेनं ५ कोटींचा व्यवसाय स्वत:च्या हिमतीवर आणि मेहनतीवर उभारला आहे. महिला दिनानिमित्त जाणून घ्या त्यांचा प्रवास...


नवी मुंबईतल्या वाशी गावात राहणाऱ्या गुनाबाई सुतार. शिक्षण फक्त पहिली पास. पण वयाच्या आठव्या वर्षापासून खेकडे पकडण्यात त्या अगदी माहीर! वयाच्या ७०व्या वर्षीही त्यांचा खेकडे पकडण्याचा उत्साह वाखणण्याजोगा आहे. फळीवरून फिरत बिनधास्त चिखलात हात घालून अगदी शिताफीनं त्या खेकडे पकडतात.

नवी मुंबईतल्या वाशी गावात गुनाबाई आणि त्यांचे अडीच-तीन किलोचे खेकडे प्रचंड लोकप्रिय. पण फक्त मुंबईतच नाही तर परदेशातही.

अगदी घरा-घरात आणि हॉटेलांमध्येही गुनाबाईंच्या खेकड्यांची चव पोहोचलीये. हॉटेलांमध्ये ५ ते २० किलोपर्यंत खेकड्यांची मागणी असते. तर परदेशात ५०० किलोपर्यंतचे खेकडे पोहोचवले जातात. सध्या सिंगापूर, मलेशिया या देशांना खेकडे पुरवले जातात.

एक एकर तलावात गुनाबाई खेकडा संवर्धनाचा व्यवसाय करतात. गुनाबाईंच्या तलावात दोन जातींचे खेकडे आढळतात. लाल खेकडे हे आकारानं छोटे असतात. ज्यांचं वजन २.५ ते ४ ग्रॅम इतकं असतं. बाजारात त्यांची किंमत ३५०-४०० रुपये इतकी आहे.

हिरवे खेकडे हे आकारानं मोठे असतात. एका खेकड्याचे वजन १ ते ३ किलोच्या आसपास असते. ज्याची बाजारात किंमत १२०० ते १४०० रुपये इतकी आहे. लाल खेकडे हे मुंबईत जास्त विकले जातात.

हिरव्या खेकड्यांना परदेशात जास्त मागणी आहे. पावसाळ्याचे चार महिने तर खूप व्याप असतो. कारण याच काळात मोठ्या प्रमाणात खेकड्यांची पैदास होते.

आठ वर्षांच्या असल्यापासून गुणाबाई बाबांसोबत मासे आणि खेकडे पकडायला वाशी खाडित जायच्या. तेव्हापासूनच त्यांना सवय लागली. बाबांकडूनच त्या  व्यवसाय कसा करायचा, मासे, खेकडे कसे पकडायचे हे शिकल्या.

गुणाबाई सांगतात, त्यावेळी वाशीला रेल्वे येत नव्हती. तेव्हाची वाशी खाडी खूप मोठी होती. खाडीत उतरून मासे आणि खेकडे पकडायचो. त्यानंतर हातहोडीने मानखुर्दला जायचो. तिकडून रेल्वे पकडून मुंबईला मासे आणि खेकडे विकण्यासाठी जायचो. 

गुणाबाईंच्या खेकड्यांना दादर, भायखळा, परेल, आगरबाजार, सिटी लाईट, ग्रँड रोड अशा अनेक मार्केटमध्ये चांगला भाव मिळायचा. त्यानंतर चेन्नईला त्यांचा माल निर्यात होऊ लागला. 

हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि त्यांनंतर खेकडे निर्यात करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या. खेकडे निर्यात करण्यासाठी लागणारे सर्व परवाने मुलगा सुभाषच्या मदतीनं काढून घेतले. त्यानंतर परदेशातही निर्यात करू लागले.

खरंच आज नवी मुंबईतले खेकडे सातासमुद्रापार पोहोचले आहेत ते केवळ गुनाबाई यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे. शिवाय त्यांच्या या व्यवसायानं अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 



हेही वाचा

ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!

International Womens Day 2022 : ५५व्या वर्षीही बॉडीबिल्डींगमध्ये ‘तिचा’ डंका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा