Advertisement

शिर्डीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पिकरविना

शिर्डीच्या साई मंदिरापाठोपाठ आता थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील लाऊडस्पिकरच्या नियमांचा फटका बसणार आहे.

शिर्डीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पिकरविना
SHARES

शिर्डीच्या साई मंदिरापाठोपाठ आता थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील लाऊडस्पिकरच्या नियमांचा फटका बसणार आहे. मंदिरातून होणारी काकड आरती आणि धुपारती आता स्पीकरवरून लावता येणार नाही. विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रोज पहाटे काकडा आरतीच्या वेळी आणि सायंकाळी धुपारातीच्यावेळी विठ्ठल मंदिरातील स्पीकरचा वापर केला जात असतो.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सकाळी ६ ते रात्री १० यावेळेतच स्पीकर लावण्याची परवानगी असल्याने काकडा आरतीच्या वेळी विठ्ठल मंदिरालाही स्पीकर लावता येणार नसून केवळ सायंकाळी होणाऱ्या धुपारातीच्या वेळी स्पीकर लावता येईल.

राज ठाकरे यांनी काढलेल्या भोंग्याच्या मुद्द्याचा सर्वात जास्त फटका हा राज्यातील हिंदू मंदिरे आणि धार्मिक कार्यांना बसणार आहे. आता या सर्व प्रश्नावर शासन काय भूमिका घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली. पण याचा फटका इतर धार्मिक प्रार्थनास्थळांना पण बसला. शिर्डीतील साईबाबा संस्थाननं देखील सकाळची काकड आरती आणि शेजारती लाऊडस्पिकरविना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

शिर्डीतील मुस्लीम समुदायानं मात्र समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनंती शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे.

आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिर्डीतील मुस्लीम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरू करावी, असे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले आहे.हेही वाचा

अजान वाजणार नाही, पण काकड आरती थांबवू नका, शिर्डीतील मुस्लिम समुदायाची मागणी

पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा 'या' २६ मशिदींचा निर्णय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा