सुरक्षित फटाके

मालाड पश्चिम - मालाडच्या पश्चिमेकडील सोमवार बाजारात होलसेल फटाक्यांची दुकानं आहेत.. या होलसेल बाजारात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महापालिका आणि अग्निशमन दलाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जातंय. सोमवार बाजारात केवळ दिवाळीतच नाही तर वर्षभर फटाक्यांची विक्री केली जाते. पण सुरक्षेच्या दृष्टीनं हे व्यापारी काळजी घेताना दिसतात.  

फटाके विकताना दुकानदाराने घ्यावयाची काळजी

1 नो स्मोकिंग चा फलक लावणे

2 माती व पाण्याचा साठा करणे

3 फटाका स्टॉलजवळ अग्निशमन सामग्री

4 स्टॉलची उंची पाच मीटरपेक्षा जास्त असू नये

5 दोन फटाके स्टॉलमध्ये किमान १.५० मीटरपेक्षा जास्त अंतर

6 स्टॉल एकमेकांसमोर असू नयेत

7 स्टॉल परिसरात वाळुच्या गोण्या असाव्यात

8 फटाके ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी आवश्यक

 

त्यामुळे या वर्षी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून फटाके विक्री केल्यामुळे यावर्षीची दिवाळी सुरक्षित जाईल यात शंकाच नाही.

Loading Comments