सरकारी सेवेतील पहिली महिला ड्रायव्हर

मुंबई - ममता पाटील ही सरकारी सेवेत वाहनचालक अर्थात ड्रायव्हर म्हणून काम करणारी पहिली आणि एकमेव महिला आहे. आवड म्हणून ड्रायव्हिंग शिकणाऱ्या ममताने याआधी ऑफिस जॉब केला. पण त्यात तीचं मन रमलं नाही. म्हणून फोरसी कॅबमध्ये ड्रायव्हर म्हणून ममता काम करू लागली. हे काम करत असतानाच तीन वर्षांपूर्वी ममताने म्हाडामध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि सर्व परिक्षा-चाचण्या पार करत ममताने ती नोकरी मिळवली.

सरकारी अधिकाऱ्यांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणं ही खूपच आव्हानात्मक बाब. त्यात म्हाडाचे अधिकारी म्हटलं की, मग मुलाखती आणि साईट व्हिजीटही आल्या. पण ममता मोठ्या हिंमतीनं ही जबाबदारी पार पाडते.

Loading Comments