तरुणाईला समाजसेवेचा ध्यास

 Sewri
तरुणाईला समाजसेवेचा ध्यास
तरुणाईला समाजसेवेचा ध्यास
तरुणाईला समाजसेवेचा ध्यास
See all

दादर - समाजात रहात असताना आपण या समाजाच काहितरी देण लागतो हा संकल्प मनात आणून लालबाग परळ दादर विभागात रहाणा-या 10 जण मित्र मैत्रिणींनी इव्हेंट पॅलेस फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केलीय. या संस्थेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेची स्थापना करणारे हे 10 जण 18 वर्षांच्या आतील वयोगटातील आहे. इव्हेंट पॅलेस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेनं रविवार 4 डिसेंबर रोजी दादरच्या संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट मधील कॅन्सर पीडित 1 वर्षापासून ते 15 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी दादर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी लागणारा सर्व खर्च इव्हेंट पॅलेस फाऊंडेशनच्यावतीनं करण्यात आला होता. यामध्ये लहान मुलांसाठी जादू, डान्स यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच शालेय वस्तू फळे खाद्यपदार्थ यांचे वाटप करण्यात आलं. आम्हाला आमच्या या संस्थेच्यावतीनं महालक्ष्मी येथील श्रमिक या आश्रमासाठी सुद्धा काम करायचं आहे. आम्ही आमच्या संस्थेमार्फत गरीबांसाठी काम करणार आहेत अस मत इव्हेंट पॅलेस फाऊंडेशनच्या श्रेया पाटणकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.

Loading Comments