Advertisement

मुंबईतील २ डॉक्टरांचा गरजूंसाठी 'मेड्स फॉर मोर' उपक्रम, 'अशी' करतात मदत

बरे झालेल्या कोरोना रुग्णांकडून हे जोडपे न वापरलेली औषधं गोळा करत आहेत.

मुंबईतील २ डॉक्टरांचा गरजूंसाठी 'मेड्स फॉर मोर' उपक्रम, 'अशी' करतात मदत
SHARES

मुंबईच्या कफ परेड इथले डॉ. मार्कस रॅन्ने आणि त्यांची पत्नी डॉ. रैना यांनी गरजूंसाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. मेड्स फॉर मोर या नावानं त्यांनी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे.

बरे झालेल्या कोरोना रुग्णांकडून हे जोडपे न वापरलेली औषधं गोळा करत आहेत. तिच औषधं ते गरजूंना पुरवत आहेत. त्यांनी १० दिवसांच्या अवधीत, बरे झालेल्या रूग्णांकडून २० किलोग्राम न वापरलेली कोरोनावरील औषधं गोळा केली आहेत.

वंचित आणि गरजूंच्या उपचारासाठी या जोडप्यानं गोळा केलेली औषधे भारताच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याचं ठरवलं आहे.

"आम्ही हा उपक्रम १० दिवसांपूर्वी सुरू केला आहे. आम्ही गृहनिर्माण संस्थांकडून औषधं गोळा करतो आणि ज्यांना परवडत नाही त्यांना औषध पुरवतो," असं डॉ. मार्कस रॅन्ने यांनी सांगितलं.

"जेव्हा आमच्या कर्मचार्‍याच्या कुटूंबातील एकाला कोविडची लागण झाली तेव्हा त्यांना औषधोपचाराची गरज भासू लागली. ही औषधे महाग असल्याचं आम्हाला कळलं. तेव्हा आम्ही बरे झालेल्या कोरोना रुग्णांकडून औषधं देणगी म्हणून द्या, असं आवाहन केलं होतं, असं डॉ. रैनानं एएनआयला सांगितलं.

"त्यानंतर, आम्ही शेजारच्या इमारतींमधील ७-८ लोकांची मदत घेतली आणि एक टीम तयार केली. जे लोक औषधं खरेदीसाठी बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा कोविड औषधे घेऊ शकत नाहीत अशा लोकांना मदत करण्याच्या उद्देशानं आम्ही या मोहिमेस प्रारंभ केला, "असं ते म्हणाले.

मेड्स फॉर मोर सर्व प्रकारच्या न वापरलेली औषधं जसं की अँटिबायोटिक्स, फॅबीफ्लू, वेदना कमी, स्टिरॉइड्स, इनहेलर, जीवनसत्त्वे, अँटासिड्स यासारख्या इतर औषधे एकत्रित करतात. ही औषधं COVID 19 च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. याव्यतिरिक्त, ते ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर सारखी मूलभूत उपकरणं देखील गोळा करत आहेत.



हेही वाचा

राज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन!, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट

वाशी, ऐरोली, नेरुळ पालिका रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारासाठी ओपीडी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा