Advertisement

मुंबई लोकल बॉम्बस्फोट : १३ वर्ष उलटली तरीही 'त्या' जखमा आजही जिवंत

माहिम स्टेशन पर श्रद्धांजलि अर्पित करेंगे लोग

मुंबई लोकल बॉम्बस्फोट : १३ वर्ष उलटली तरीही 'त्या' जखमा आजही जिवंत
SHARES

भारताची आर्थिक राजधानी मुंबई ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांनी हादरली. या हल्ल्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास  ७०० लोक जखमी झाले.

मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आणि लोकल ट्रेनमध्ये हे सगळे स्फोट झाले. संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ या ११ मिनिटांच्या कालावधीत हे  बॉम्बस्फोट झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. 


स्फोटाची आखणी

अतिशय योजनात्मक पद्धतीनं साखळी बॉम्बस्फोटांची योजना आखण्यात आली होती. दहशतवादी तयार करण्यापासून ते स्फोट करण्यापर्यंत अनेक बाबींवर खास मेहनत घेण्यात आली.

 • मार्च  २००६ : बहावलपूर इथं लष्कर-ए-तयबाचा  सूत्रधार अझम चिमा याच्या हवेलीत कटाचा डाव शिजला. ‘सिमी’ आणि ‘लष्कर’चे नेत्यांनी एकत्र येत हा कट रचला. ५० दहशतवाद्यांना बहावलपूरमध्ये प्रशिक्षणासाठी  पाठवलं. तिथं त्यांना खास प्रशिक्षण दिलं.
 • २५ जून २००६ : ‘लष्कर’नं  बॉम्ब पेरणाऱ्यांना भारतात  घुसवलं. नेपाळ सीमेमार्गे कमाल अन्सारीनं दोघा पाकिस्तानींना, अब्दुल माजीदनं पाच जणांना बांगलादेशमार्गे आणि चौघांना कच्छमार्गे भारतात आणलं. 
 • २७ जून २००६ : मुंबईच्या उपनगरांत चार ठिकाणी ११ जणांना पेरण्यात आलं.
 •  ८ ते १० जून २००६ : एहसान उल्लाहनं १५ ते २० किलो आरडीएक्‍स पाकिस्तानातून कांडलामार्गे भारतात आणलं. अमोनिअम नायट्रेट मुंबईत खरेदी केलं. सांताक्रूज भागातील दोन ठिकाणांवरून ८ प्रेशर कुकर खरेदी केले.
 •  ते १० जुलै २००६ : गोवंडीतील महम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये बॉम्ब बनवले.असा आहे घटनाक्रम

 • ११ जुलै २००६ : आरोपी वेगवेगळ्या टॅक्‍सीमधून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर गेले. तिथे वेगवेगळ्या उपनगरी गाड्यांमध्ये स्फोटकांच्या सात पिशव्या ठेवण्यात आल्या. सायंकाळी ६.२४ वाजता माटुंग्यातील लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्फोट झाला. नंतरच्या आठ मिनिटांमध्ये भाईंदर, सांताक्रूझ, माहीम, वांद्रे, जोगेश्‍वरी, बोरीवली आणि खार रोड या स्थानकांवर एकामागून एक स्फोट झाले.
 • जुलै ते ऑक्‍टोबर २००६ : या कालावधीत मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाकडून ‘सिमी’शी संबंधित १३ जणांना अटक करण्यात आली. १९७७ मध्ये उत्तर प्रदेशात स्थापलेल्या ‘सिमी’वर नंतर बंदी घातली होती.  
 • ३० नोव्हेंबर २००६ : एटीएसतर्फे अटकेतल्या १३ आणि फरार १५ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
 • २९ सप्टेंबर २००६ : प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून ते  वेगवेगळ्या लोकलच्या डब्यांत ठेवण्याचं काम ‘लष्कर-ए-तोयबा’च्या सदस्यांनी केलं, असा दावा मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त ए. एन. रॉय यांनी केला.
 • जून २००७ : सुनावणीला  सुरुवात
 • फेब्रुवारी  २००८ : मोक्कांअंतर्गत वापरलेला ‘प्रमोटिंग इनसर्जन्सी’ हा वाक्‍यप्रयोग घटनाबाह्य आहे, असा दावा १३ संशयितांपैकी कमाल अन्सारी यानं केल्यानं सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीला स्थगिती देण्यात आली.
 • सप्टेंबर २००८ : इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम)ऑपरेटिव्हला अटक
     
 • एप्रिल २०१० : सर्वोच्च न्यायालयानं कमाल अन्सारीचा अर्ज फेटाळला. 
     
 • १३  फेब्रुवारी २०१० : आरोपी फाहिम अन्सारी याचे वकील शाहीद आझमी यांची मुंबईतील कार्यालयात गोळ्या घालून  हत्या
     
 • ३० ऑगस्ट २०१३ : इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याला भारत-नेपाळ  सीमेवर इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोनं साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक केली. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचे उट्टे काढण्यासाठी २००६ मध्ये साखळी स्फोट घडवल्याचं यासीननं सांगितलं. त्यामुळे ‘एटीएस’नं अटक केलेल्या १३ जणांबाबत प्रश्‍न निर्माण  झाला.
 • २० ऑगस्ट २०१४ : सरकारी पक्षानं २०० साक्षीदारांच्या आणि बचाव पक्षानं ४० साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर खटल्याचं कामकाज आठ वर्षांनंतर संपलं.
 • ११ सप्टेंबर २०१५ : विशेष न्यायालयानं १३ आरोपींना दोषी ठरवलं.
 • ३० सप्टेंबर २०१५ : विशेष न्यायाधीश यतीन शिंदे यांनी पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा  दिली.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा