Advertisement

एका लग्नाची अजब गोष्ट! लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लग्न

मुंबईतल्या एका जोडप्यानं लॉकडाऊन काळातही आपला लग्न सोहळा पुढे ढकलला नाही. तर या लॉकडाऊनमध्ये देखील त्यांनी लग्न उरकलं ते या पद्धतीनं...

एका लग्नाची अजब गोष्ट! लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लग्न
SHARES

COVID 19 या आजाराच्या उद्रेकानंतर देशभरात लॉकडाऊनलागू करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या बऱ्याच ठरवलेल्या योजना काही महिन्यांकरीता पुढे ढकलल्या आहेत. नव्या व्यवसायाची सुरुवात असेल, कोणाच्या प्रवासाच्या योजना असतील किंवा विवाहसोहळा असेल, हे सर्व कोरोनाव्हायरसच्या भितीनं सध्या तरी पुढे ढकलण्यात आलं आहे.

पण मुंबईतल्या एका जोडप्यानं लॉकडाऊन काळातही आपला लग्न सोहळा पुढे ढकलला नाही. २९ वर्षीय मुंबईतील मर्चंट नेव्ही ऑफिसर प्रीत सिंग आणि दिल्लीची मुलगी नीत कौर यांचं लग्न ४ एप्रिलला होणार होतं. पण कोरोनाच्या संकटामुळे हे लग्न रद्दच होण्याच्या मार्गावर होतं. पण वर-वधुच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली आणि तात्काळ ही कल्पना त्यांनी अमलात आणली ना भाऊ!

लॉकडाऊनमुळे प्रीतला वऱ्हाड घेऊन दिल्लीला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे या दोघांनी व्हर्च्युअली लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनाही हा प्रस्ताव आवडला. त्यानंतर ४ एप्रिल रोजी या दोघांनी व्हिडिओ कॉलिंग अॅपचा वापर करून लग्न उरकून घेतलं. दिल्लीत नीत आणि तिचे कुटुंबीय त्यांच्या घरात उपस्थित होते. तर मुंबईत प्रीत आणि त्यांचं कुटुंबीय मुंबईतील घरात हजर होतं. या दोघांच्या मध्ये होता फक्त व्हिडिओ कॉलिंग अॅप. या व्हिडिओ सेशनमध्ये त्यांचे इतर नातेवाईकही सहभागी झाले आणि रितीरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला.

यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी नववधू-वरांना आशीर्वादही दिले. वेगवेगळ्या शहरातून या व्हर्च्युअल विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नातेवाईकांनी लग्न लागताच डान्स करण्यास सुरुवात केली. घरातल्या घरात एकमेकांना मिठाई ही भरवली. शीख परंपरेनुसार गुरुजींच्या आशीर्वादाशिवाय विधी अपूर्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट सरल्यानंतर गुरुद्वाराला भेट देणार असल्याचं या कुटुंबानं सांगितलं.

एका सोशल नेटवर्क साइटवर भेटले आणि प्रेमात पडले. या दोघांनी लग्नही करायचे ठरवले. लग्नासाठी नीत आणि तिचे कुटुंब मुंबईला येणार होते. मात्र, करोना विषाणू भारतभर फैलावला आणि संपूर्ण देशाला लॉकडाऊनला सामोरे जावं लागलं. प्रीत आपल्या बॅचलर पार्टीसाठी गोव्यात जाणार होता, पण लॉकडाउनमुळे तेही शक्य झाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर नीत मुंबईला शिफ्ट होईल. त्यानंतर हनिमुनला जाण्याचा त्यांचा विचार आहे, अशी माहिती त्यांनी एका वत्तपत्राला दिली.



हेही वाचा

तेजानं उजळली मुंबई!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा