Advertisement

१५ जानेवारीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होणार

येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि आजूबाजूच्या भागात तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

१५ जानेवारीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होणार
SHARES

भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) गुरुवारी, १३ जानेवारी रोजी जाहीर केलं की, आठवड्याच्या शेवटी मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी अधिकच वाढली आहे. येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि आजूबाजूच्या भागात तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

गुरुवारी, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेनं नोंदवलेलं किमान तापमान मागील दिवसाच्या तुलनेत १६ अंश सेल्सिअसनं किंचित वाढलं आहे.

बुधवारी, १२ जानेवारी रोजी, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेनं नोंदवलेलं कमाल तापमान २७.३ अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, आयएमडीच्या कुलाबा वेधशाळेनं नोंदवलेलं कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान १६.२ अंश सेल्सिअस होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १५ ते २० जानेवारीपर्यंत मुंबईचे कमाल तापमान ३०-३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस ते २१ अंश सेल्सियसपर्यंत वाढेल.

शिवाय, IMD च्या प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई, पुढील ७ दिवसांच्या अंदाजानुसार, गुरुवारपासून आठवड्यातील रात्रीचं तापमान वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय, आयएमडी नागपूरनं विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गुरुवारपर्यंत येलो अलर्ट जाहीर केला आहे. पुढील २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.हेही वाचा

मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

माझगाव, कुलाब्यातील हवा जास्त प्रदूषित

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा