Advertisement

26/11: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली


26/11: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
SHARES

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलिस जिमखाना स्मारक इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहिदांचे नातेवाईकही उपस्थित होते. त्यांनीही शहिदांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणी जागवल्या.


सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

२६/११ च्या पार्श्वभूमीवर मुंबई सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशाच्या इतिहासतील हा काळा दिवस असून आजही मुंबईकरांच्या मनात या घटनेच्या कटू आठवणी आहेत. सीएसटीएम, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल आणि अन्य ठिकाणी दहशतवादी हल्ला केला. यात हेमंत करकरेंसारख्या अधिकाऱ्यासह अनेक जण शहीद झाले. या शहिदांना २६/११ शहीद स्मारक इथं श्रद्धांजली वाहण्यात आली. तर पोलिसांकडून शहिदाना मानवंदना देण्यात आली.


नरिमन हाऊस इथं होणार संग्रहालय

२६/११ हल्ल्यातील महत्त्वाचं असं ठिकाण असलेल्या नरिमन हाऊस इथंही शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान नरिमन हाऊस इथं आता २६/११ च्या हल्ल्याची संपूर्ण माहिती देणारं संग्रहालय निर्माण करण्यात येत आहे. नरिमन हाउसच्या चौथ्या आणि ५ व्या मजल्यावर संपूर्ण अंधार असणार असून या अंधारात हल्ला कसा झाला, त्यावेळी कशी परिस्थिती होती? याचा अनुभव घेता येणार आहे. या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं सोमवारी उद्घाटन होणार असून वर्षभरात संग्रहालयाच संपूर्ण काम पूर्ण होणार आहे.


ऑनलाईन नोंदणी करावी लागणार

या संग्रहालयाला भेट देण्यासाठी पर्यटक आणि मुंबईकरांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तर आता नरिमन हाऊस संग्रहालयात रुपांतरीत झालं असून आता याचं नाव बदलण्यात आलं आहे. नरिमन लाइट हाउस म्हणून आता ही इमारत ओळखली जाईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement