Advertisement

सौर उर्जेवर चालणारी मशीद

मालाडमधल्या पठाणवाडीतल्या नूरानी मस्जिदसाठी देखील सौर उर्जा हे शस्त्र रामबाण उपाय ठरत आहे. वीज वाचवण्यासाठी सौर उर्जेचा वापर करणारी मुंबईतील ही आठवी मस्जिद आहे.

सौर उर्जेवर चालणारी मशीद
SHARES

वर्षभर सूर्यदेवता प्रसन्न असलेल्या भाग्यवान देशांमध्ये भारताचा समावेश आहे. या देवतेकडून भरभरून मिळणारी उर्जा आजपर्यंत आपण वाया घालवली. मात्र कार्बन उत्सर्जनाविरोधातील लढ्यात आता सौर उर्जेचं शस्त्र रामबाण उपाय ठरणार आहे. मालाडमधल्या पठाणवाडीतल्या नूरानी मशीदसाठी देखील सौर उर्जा हे शस्त्र रामबाण उपाय ठरत आहे. वीज वाचवण्यासाठी सौर उर्जेचा वापर करणारी मुंबईतील ही आठवी मशीद आहे.


वीज वाचवण्यासाठी पुढाकार

नूरानी मशिदीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. २५ किलोवॅट क्षमता असलेले ७२ सोलर पॅनल्स बनवण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात सौर यंत्रणा ११० युनिट्स वीज निर्मिती करते आणि मान्सून हंगामात ८० युनिट्स वीज निर्मिती करते. याचा वापर मशिदीतील लाईट्स, फॅन, एसी आणि इतर कामांसाठी देखील केला जातो.


विजेसोबत पैशांचीही बचत

सोलार पॅनलच्या मदतीनं दरवर्षी ३५ हजार युनिट्स वीज निर्मिती केली जाते. तर मशिदीचा वार्षिक वापर ८० हजार युनिट्सचा आहे. म्हणूनच, या प्रणालीमुळे मशिदीला दरवर्षी सुमारे ४.३ लाख बचत करता येते. मशिदीच्या विश्वस्तांच्या मते, विजेचं बिल ८५ हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ३७ हजार ४०० रुपये झाले आहे.

एमएसएसएस ग्रीन टेक या कंपनीनं हे सोलार पॅनल बसवले आहेत. कंपनीनुसार, मशिदीच्या छतावर अधिक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी २५ किलोवॅट क्षमतेचा समावेश होईल. २०२० पर्यंत मशिदचं ९० टक्के वीज बिल कमी होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी १५.२३ लाख लागले असून साडे-तीन वर्षात ही रक्कम वसूल होईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं.


आम्ही उचलेलं हे पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. पुढील पिढीसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. सौर उर्जेचा वापर करून वीज बचत करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. सौर ऊर्जा वापरुन १७.५ टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखतोय.

- रशिम गुलाम रसूल मरेडिया, अध्यक्ष


७ मशिदी सौर उर्जेवर

सौर उर्जेचा वापर करणारी नूरानी ही पहिली मशीद नाही. तर मुंबईत एकूण ७ मशिदी सौर उर्जेवर चालतात. मदरसा-ए-मोहमदडिया, आग्रिपाडातील आकाश मस्जिद, कळबादेवी इथली जामा मस्जिद, मोहम्मद अली रोडवरील मीनारा मस्जिद, मस्जिद बंदरमधील झकारिया मस्जिद आणि भायखळा इथली ताक्वा मस्जिद या मशिदी सौर उर्जेवर चालतात.



हेही वाचा

१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा