अनाथ मुलांना शालेय वस्तूंचं वाटप


  • अनाथ मुलांना शालेय वस्तूंचं वाटप
  • अनाथ मुलांना शालेय वस्तूंचं वाटप
  • अनाथ मुलांना शालेय वस्तूंचं वाटप
SHARE

दादर - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीनं घे भरारी या कार्यक्रमांतर्गत 200 हून अधिक अनाथ मुलांना शालेय आणि जीवनाश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. दादर पू्र्व येथील सेंट्रल रेल्वे वेल्फेअरच्या सभागृहात शनिवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड विक्रांत वाघचौरे, राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष चंद्रकांत मोरे, राष्ट्रीय संचालक वामन साळगांवकर, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात येतात. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना, तसंच शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असोसिएट्सच्या वतीनं मदत करण्यात येते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या