हुंडाविरोधी दिनानिमित्त विद्यार्थांची फेरी

 vile parle
हुंडाविरोधी दिनानिमित्त विद्यार्थांची फेरी
हुंडाविरोधी दिनानिमित्त विद्यार्थांची फेरी
हुंडाविरोधी दिनानिमित्त विद्यार्थांची फेरी
See all

विले पार्ले - मुंबईतली हुंडाविरोधी चळवळ ही सामाजिक संस्था हुंड्याविरोधात 44 वर्षांपासून चळवळ करते आहे. या वर्षी हुंडाविरोधी दिनानिमित्त संस्थेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला सकाळी साडे आठ वाजता ही फेरी निघेल. हुंडाविरोधी सामाजिक संस्थेचं विले पार्ले कार्यालय ते साठ्ये महाविद्यालय अशी ही फेरी असेल. तसंच 27 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गटांसाठी आंतरमहाविद्यालयीन लघुपट आणि वक्तृत्व स्पर्धाही साठ्ये महाविद्यालयात होणार आहे. या सप्ताहादरम्यान विविध महाविद्यालयांतून हुंड्यांचे दुष्परिणाम दाखवणारी चित्रं प्रदर्शित केली जातील. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभागी व्हावं, असं आवाहन संस्थेच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी केलंय.

Loading Comments