Advertisement

पुरुषांची मक्तेदारी मोडून काढणारी सुनीता


SHARES

भायखळा - आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करत आहेत. मात्र अजूनही काही अशी क्षेत्र आहेत जिथे फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असते. पण आता अशा क्षेत्रातही महिला पुढाकार घेत आहेत. शाळेच्या बसवर महिला बस ड्रायव्हर तुम्ही कधीच पाहिली नसले. पण भायखळ्यात एक महिला ड्रायव्हर शाळेतल्या मुलांना शाळेतून घरी पोहोचवण्याचे आणि आणण्याचे काम करते. सुनीता भोगले असे या महिलेचे नाव आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती या व्यवसायात आहे. सुनीताला तिचा पती संजीव भोगलेचा पूर्ण पाठिंबा आहे. 12 वर्षांच्या मेहनतीनंतर सुनीताला त्याचे फळ मिळाले आहे. या व्यवसायाचाही महिलांनी विचार करावा, असं मत सुनीताने व्यक्त केलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा