Advertisement

अनाथांची आई सिंधु ताई सपकाळ यांचं निधन

पुण्याच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनाथांची आई सिंधु ताई सपकाळ यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ समाजसेविका सिंधु ताई सकपाळ ( sindhutai sapkal) यांच  निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. ७५ वर्षींच्या सिंधु ताईंवर पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  

काही दिवसांपूर्वी त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनानं हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.

सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता.

त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा