Advertisement

कामत कुटुंबियांना दिलासा, औषधावरील सीमा शुल्क माफ

SMA आजारावर लागणारं इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती.

कामत कुटुंबियांना दिलासा, औषधावरील सीमा शुल्क माफ
SHARES

स्पायनल मस्क्युलर अटॉफी (SMA) हा दुर्धर आजारानं ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. SMA आजारावर लागणारं इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. हेच सीमा शुल्क माफ करण्यात आलं आहे.

त्याबाबतचं एक सर्टिफिकेट आरोग्य विभागानं कामत कुटुंबाला सोमवारी पाठवलं आहे. आता हे पत्र कामत कुटुंब संबंधित औषध कंपनीला पाठवणार आहे. या पत्राच्या आधारे तीराच्या औषधावरील कर माफ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कामत कुटुंबाला राज्य सरकारच्या या सर्टिफिकेटमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


सीमा शुल्क माफ व्हावं यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानंं आम्हाला एक सर्टिफिकेट दिलं आहे. त्यात सीमा शुल्क माफ केल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी हे औषध भारतात येण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मिहिर कामत, तीराचे वडिल

५ महिन्यांच्या चिमुकल्या तीरावर सध्या तिच्या अंधेरीतील घरी पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तीराची प्रकृती स्थित असल्याची माहिती तिच्या कुंटुंबियांनी दिली आहे. दरम्यान, चिमुकलीच्या रक्ताचा एक अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो अहवाल पुढील २-३ दिवसांत आल्यानंतर तीराला औषध मिळणं शक्य होणार आहे.

तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर आजार आहे. तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. त्यासाठी कामत कुटुंबियांना अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी मदत केली. त्यातून तब्बल १६ कोटी रुपयांची रक्कमही उभा केली.

पण अमेरिकेतून हे औषध भारतात आणण्यासाठी कस्टम ड्यूटी अर्थात सीमा शुल्क लागणार होते. जवळपास २ ते ५ कोटी रुपये यासाठी लागणार होते. त्यामुळे कामत कुटुंबानं हे सीमा शुल्क माफ करण्याची विनंती राज्य आणि केंद्र सरकारला पत्राद्वारे केली होती.

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते.

त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.हेही वाचा

शिवाजी पार्कच्या मधली गल्ली कपडे दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा