त्यांच्या अस्तित्वाची लढाई अखेर त्यांनी जिंकली!

मालाड- घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोन युवकांनी तृतीयपंथी समाजात प्रवेश केला आहे. नवनाथ आणि एंजल अशी या तृतीयपंथींची नावं असून, आता त्यांनी आपली नावं देखील बदलली आहेत. अजय आता एंजल तर नवनाथ आता नव्या बनला आहे. आता हे दोघेही आपलं घर सोडून थेट तृतीयपंथी समाजामध्ये रहायला आलेत. हे दोघेही घरातून पळून तृतीयपंथी गुरू रौशनी हिच्या घरी राहायला आले आहेत. दरम्यान त्यांच्या घरच्यांचा याला विरोध होता. मात्र पोलिसांच्या मदतीने गुरु रौशनी याने त्यांना आपल्या घरी आणले. विशेष म्हणजे त्यांच्या घरच्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप देखील या दोघांनी केला आहे.

Loading Comments