जुन्या आठवणींना उजाळा

 Dadar
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा
See all

दादर - राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र सावरकर सभागृहात कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येसूबाई सावरकर, यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर, शांताबाई सावरकर या सावरकर बंधूंच्या पत्नी आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रसिद्ध वक्ते आणि विचारवंत डॉ. अशोक मोडक यांचं व्याख्यान झालं. डॉ. मोडक यांनी सावरकरांच्या बंधूंच्या पत्नींबद्दलही विचार मांडले. या वेळी स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशीही उपस्थित होते. दादरमधल्या वृद्ध महिलांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

Loading Comments