Advertisement

'सिंहासन'कार अरुण साधू यांचे निधन


'सिंहासन'कार अरुण साधू यांचे निधन
SHARES

साहित्य आणि पत्रकरिता अशा दोन्ही क्षेत्रात लिलया मुशाफिरी करणारे, या दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवणारे जेष्ठ साहित्यकार आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. 76 वर्षीय साधू यांना प्रकृती अस्वास्थामुळे रविवारी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साधू यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नायर हॉस्पिटलमध्ये त्यांचे पार्थिव दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या देहदानाची प्रक्रिया पार पडली. 

'सिंहासन' या त्यांच्या कादंबरीने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडवली होती. या कादंबरीवर आधारित सिंहासन चित्रपटही चांगलाच गाजला. इतिहास विषयावरही साधू यांचे विशेष प्रभुत्व होते. साधू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एकपरखड, व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे 

- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा