Advertisement

विजय मल्ल्याला मोठा झटका, इंग्लंडमधील कोर्टाने प्रत्यार्पण याचिका फेटाळली

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून लंडनमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला इंग्लंडमधील उच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा झटका मिळाला

विजय मल्ल्याला मोठा झटका, इंग्लंडमधील कोर्टाने प्रत्यार्पण याचिका फेटाळली
SHARES

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून लंडनमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला इंग्लंडमधील उच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा झटका मिळाला. माल्या याची भारत सरकारकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे विजय मल्ल्याला भारतात आणण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं असल्याचं मानण्यात येत आहे

भारतात परतल्यावर अटक होईल म्हणून माल्ल्यानं स्वतःच्या प्रत्यार्पणाविरोधात दावा दाखल केला होता. पण त्याचा हा दावा फेटाळण्यात आला असून त्याला प्रत्यर्पण करावंच लागेल. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाने सोमवारी याचिका फेटाळली. आता हे प्रकरण युकेच्या होम सेक्रेटरी प्रीती पटेल यांच्याकडे गेले असून त्यांच्या निर्णयावर मल्ल्याचे भारतातील प्रत्यार्पण अवलंबून आहे.

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने वेगवेगळ्या बँकांकडून तब्बल ९००० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. पण या कर्जाची परतफेड न करता विजय मल्ल्या इंग्लंडला पळून गेला होता. विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्येच जामीनावर मुक्त आहे. ३१ मार्चला केलेल्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, किंगफिशर एअरलाईन्सने घेतलेले १०० टक्के कर्जाची परतफेड करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी मी रितसर तयारीही दर्शविली आहे.



हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा