Advertisement

मुंबई पोलिसांना सलाम...!


SHARES
Advertisement

मुंबई- सद्रक्षणाय..खलनिग्रहणाय..या ब्रीदवाक्याला जपण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते झटत असतात. आधी समाज आणि मग कुठे वेळ मिळाला तर कुटुंब असाच काहीसा पोलिसांचा बाणा असतो. कुठलाही सण आला तरी जास्त कामाचा ताण वाढतो तो म्हणजे पोलिसांवर. आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतो. पोलीस मात्र ड्युटीवर असतात. सतत कामाच्या व्यापात अडकलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनाही त्यांची काळजी वाटत असते. घरातील कर्ता माणूसच सणासुदीच्या दिवसात घरी नसेल, तर त्याचा परिणाम घरातल्या प्रत्येकावरच होतो. स्वत:च्या कुटुंबापेक्षाही समाजाच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांना आणि देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना मुंबई लाईव्हचा सलाम...!

संबंधित विषय
Advertisement