मुंबईकरांना अनुभवता येणार 'व्हिंटेज कार' रॅली

‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन’ या संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने व्हिंटेज रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी १९०३ सालच्या हम्बर, १९३५ च्या बेंटले ड्रॉपहेड कूप सहित २०० व्हिंटेज कार पाहता येणार आहेत.

SHARE

‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन’ने १७ मार्च रोजी मुंबईत व्हिंटेज रॅलीचं आयोजन केलं आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी १९०३ सालच्या हम्बर, १९३५ च्या बेंटले ड्रॉपहेड कूप सहित २०० व्हिंटेज कार पाहता येणार आहेत.


विशेष कार्यक्रमाचं आयोजन

व्हिंटेज कारची आवड असणाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे . संस्था यावर्षी आपलं १०० वं वर्ष साजरं करत असून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना वाहतूक सुरक्षा नियमांबद्दलही माहिती देण्यात येणार आहे. रॅलीच्या पूर्वसंध्येला वरळीतील ‘ओमकार १९७३’ या इमारतीत या गाड्यांचं प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती ‘डब्ल्यूआयएए’चे कार्यकारी अध्यक्ष नितीन दोसा यांनी दिली.


केवळ व्हिंटेज कार

'व्हिंटेज अँड क्लास कार ऑफ इंडिया' तर्फे १७ मार्चला आयोजित होणाऱ्या रॅलीमध्ये व्हिंटेज कार्स वरळीपासून वांद्रेतील सॉफिटेल हॉटेलपर्यंत धावतील, असं दोसा म्हणाले. यापूर्वी आयोजित केलेल्या एका शोमध्ये मॉडर्न कार आणि बाईक्सचा समावेश होता. परंतु यंदाच्या शोमध्ये केवळ व्हिंटेज कार आणि बाईकचा समावेश असेल असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -

'इथं' असेल महापौरांचं नवं निवासस्थान

१४ पक्षांची नोंदणी धोक्यात; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
संबंधित विषय
ताज्या बातम्या