१४ पक्षांची नोंदणी धोक्यात; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील १४ पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

SHARE

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील १४ पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच १० मार्चपर्यंत सर्व पक्षांना खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.


कोणते आहेत पक्ष ?

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) आणि संयुक्त जनता दल या पक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

१५ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच वेळोवेळी याबाबत माहितीही देण्यात आली होती. त्यानंतर आता कठोर पावलं उचलत निवडणूक आयोगाने पक्षांची नोंदणी का रद्द करू नये यासाठी नोटीस बजावली आहे.
हेही वाचा - 

लिहून घ्या... राज्यात मुदतपूर्व निवडणुका नाही : मुख्यमंत्री

'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवसंजीवनी; रेल्वेसाठी ५४ हजार कोटींचा निधी
संबंधित विषय