Advertisement

लिहून घ्या... राज्यात मुदतपूर्व निवडणुका नाही : मुख्यमंत्री

ठरलेल्या वेळेतच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व चर्चांना गुरुवारी पूर्णविराम दिला.

लिहून घ्या... राज्यात मुदतपूर्व निवडणुका नाही : मुख्यमंत्री
SHARES

उद्या राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार, आज रात्रीत राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार, लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होणार, अशा चर्चा, अनेक तर्कवितर्क गुरुवारी सकाळपासून रंगल्या होत्या. परंतु यापैकी काहीही होणार नसून ठरलेल्याच वेळेत विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. 


मुदतपूर्व निवडणुका नाही

महाराष्ट्र आणि हरियाणाची विधासभा बरखास्त करण्याच्या दिल्लीत हालचाली सुरू असून त्याचा आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. तसंच या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकांबरोबरच घेतल्या जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी या चर्चांवर पडदा टाकत मुदतपूर्व निवडणुकीच्या सुरू असलेल्या चर्चा या निराधार असल्याचं स्पष्ट केलं. मुदतपूर्व निवडणुका होणार नसल्याचं वक्तव्य हवं असल्यास लिहून घ्या, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


यामुळे चर्चा

याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत विक्रमी असे २२ निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी आणि त्यानंतर अनेक कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमिवर राज्य सरकार विसर्जित करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसंच यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच विधानसभा बरखास्त केली जाईल आणि लोकसभेच्या निवडणुकाही सोबत घेतल्या जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं म्हटलं होतं.




हेही वाचा - 

आता येणार २० रुपयांचं नाणं

महिला फायर फायटर्सना सुयशचा सलाम!




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा