Advertisement

महिला फायर फायटर्सना सुयशचा सलाम!

मराठी सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता सुयश टिळक सामाजिक जाणिवेचं भान राखून अभिनय करणारा कलाकार आहे. सुयशनं महिला दिनाचं औचित्य साधत मुंबईतील महिला फायर फायटर्सची भेट घेत त्यांच्या कार्याला सलाम केला.

महिला फायर फायटर्सना सुयशचा सलाम!
SHARES

'का रे दुरावा' या मालिकेद्वारे नावारूपाला आल्यानंतर 'क्लासमेट' आणि 'कॅाफी आणि बरंच काही...' सारख्या महत्त्वपूर्ण मराठी सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता सुयश टिळक सामाजिक जाणिवेचं भान राखून अभिनय करणारा कलाकार आहे. सुयशनं महिला दिनाचं औचित्य साधत मुंबईतील महिला फायर फायटर्सची भेट घेत त्यांच्या कार्याला सलाम केला.


हिलांचा उत्साह वाढवला

आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. पुरुषांच्या खांद्यावर खांदा लावत, अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक क्षेत्रात आज महिला काम करत आहेत. अग्निशामक दलासारख्या शारीरिक आणि धोकादायक क्षेत्रातही आज भारतीय महिलांनी आपला यशस्वी पाय रोवला आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आग लागण्यासारख्या असंख्य घटना घडत असतात, त्यावेळी, या महिला फायर फायटर्स पुरुष कर्मचाऱ्यांसोबत आगीशी दोन हात करतात. 'महिला दिन' औचित्य साधत सुयशनं महाराष्ट्रातील जिगरबाज फायर फाइटर्स महिलांचा उत्साह वाढवला.


कर्तृत्वाची जाण

महिला फायर फायटर्सच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी सोशल हुटच्या सहकार्यानं, भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या फायरलेडींची सुयशनं भेट घेतली. मुंबई अग्निशमन दलाचं मुख्यालय असलेल्या भायखळा अग्निशमन केंद्रातील महिलांची कार्यप्रणाली आणि त्यांचा जीवनप्रवास त्यानं जाणून घेतला. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचा उत्साह वाढवला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कलाकारांनाही त्यांच्या कर्तृत्वाची जाण असल्याची जाणीव त्यांना करून दिली.


कौतुक करावं तितकं कमीच

स्त्री आपल्या समाजातील एक महत्वाचा घटक आहे. 'आग' या तत्वाचा वापर ती आधीपासून करत आली आहे. मात्र, आता केवळ स्वयंपाकासाठी नव्हे तर, शहराचं रक्षण करण्यासाठीदेखील आजची स्त्री आगीच्या सान्निध्यात जात आहे. त्यामुळं या सर्व महिलांच्या धाडसाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच असल्याचं मत सुयशनं व्यक्त केलं.



हेही वाचा -

मुंबई-नाशिक लोकलला घाट मार्गाचा अडसर?

१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचे सरकारचे उद्दिष्ट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा