Advertisement

१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट

राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून १ कोटी २२ लाख बालकांना पोलीओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट
SHARES

राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून १ कोटी २२ लाख बालकांना पोलीओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी राज्यभर ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहेत.

९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण

गेल्या वर्षी सुमारे १ कोटी २० लाख ९८ हजार बालकांना पोलिओ डोस देऊन ९९.७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं होतं. यावर्षी १ कोटी २२ लाख बालकांना डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यावेळी अभियानासाठी २ लाख १९ हजार ३१३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच यावेळी १३ हजार ९२७ मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहणार आहेत.

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. तसंच आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओचे डोस देण्याचं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.




हेही वाचा -

Exclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल

५४ हजार कोटींच्या ‘एमयूटीपी ३ए’ ला केंद्राची मंजुरी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा