Advertisement

'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवसंजीवनी; रेल्वेसाठी ५४ हजार कोटींचा निधी

५४ हजार ७७७ कोटींच्या ‘एमयूटीपी ३ए’ला गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. मुंबईसाठी आवश्यक अनेक प्रकल्प यातून मार्गी लागणार आहेत.

'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवसंजीवनी; रेल्वेसाठी ५४ हजार कोटींचा निधी
SHARES

५४ हजार ७७७ कोटींच्या ‘एमयूटीपी ३ए’ला गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. मुंबईसाठी आवश्यक अनेक प्रकल्प यातून मार्गी लागणार आहेत. या रकमेचा वापर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) कामांसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.    


५०-५० टक्के वाटा

या योनेसाठी आवश्यक असलेल्या निधीमधून ५० टक्के निधी केंद्र सरकार तर ५० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ‘एमयूटीपी ३ए’साठी आवश्यक निधीची घोषणा करण्यात आली होती.


कोणते असतील प्रकल्प ?

‘एमयूटीपी ३ए’ अंतर्गत मुंबईतील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. यामध्ये सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडोर तयार करणं, पनवेल ते विरार मार्गावर सबर्बन कॉरिडोर, गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार, बोरीवली-विरार दरम्यान ५वी आणि ६ वी मार्गिका टाकणं, कल्याण-आसनगांवदरम्यान चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्यासारखी कामंही हाती घेण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त रेल्वे स्थानकांवरील सेवा सुधारणं आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.


स्थानकांचा कायापालट

मुंबईतील उपनगरिय रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी या निधीतील रक्कम खर्च करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरिय रेल्वे सिस्टममध्ये ११९ स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश रेल्वे स्थानकं ८० वर्ष जुनी आहेत. या स्थानकांच्या आधुनिकीकरणाबरोबरच या स्थानकांवरील सेवा सुविधाही वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.



हेही वाचा - 

मुंबई-नाशिक लोकलला घाट मार्गाचा अडसर?

चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा