Advertisement

जागतिक एड्स दिन विशेष: ‘एचआयव्ही माझा हिरो!’

डॉली नजीम खान या एक तृतीयपंथी आहेत. त्यांना 1993 मध्ये एचआयव्हीची लागण झाली. सर्वात आधी डॉली यांनी आपल्या घरी ही गोष्ट सांगितली. पण, कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढलं. राहायचं कुठे? काय खायचं? अशा अनेक प्रश्नांनी तिला घेरलं होतं. पण इच्छाशक्ती असेल तर समस्यांवर मात करत मार्ग काढता येऊ शकतो, हे डॉलीनं दाखवून दिलं.

जागतिक एड्स दिन विशेष: ‘एचआयव्ही माझा हिरो!’
SHARES

एचआयव्ही झालेल्या लोकांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन आजही तितकाच संकुचित आहे. पण, समाजाच्या दृष्टीकोनाला बाजूला सारत एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या डॉली नजीम खान यांनी समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


कोण आहेत डाॅली खान?

डॉली नजीम खान या एक तृतीयपंथी आहेत. त्यांना 1993 मध्ये एचआयव्हीची लागण झाली. सर्वात आधी डॉली यांनी आपल्या घरी ही गोष्ट सांगितली. पण, कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढलं. कुटुंबीयांनी साथ सोडल्यानंतर डॉली उत्तर प्रदेशातून मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत त्या अगदी एकट्या होत्या. घर सोडून मुंबईत आलेल्या डॉलीपुढे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले होते. राहायचं कुठे? काय खायचं? अशा अनेक प्रश्नांनी तिला घेरलं होतं. पण इच्छाशक्ती असेल तर समस्यांवर मात करत मार्ग काढता येऊ शकतो, हे डॉलीनं दाखवून दिलं. उदरनिर्वाहासाठी डॉलीनं हॉस्पीटलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये ती कामाला लागली. आजही ती तिथेच काम करत आहे. तिच्या मते एचआयव्ही हा एक हिरो आहे. ती तृतीयपंथी आहे आणि त्यात तिला एचआयव्ही देखील आहे. पण तरीही तिला समाजानं स्वीकारलं. 

हेही वाचा

जागतिक एड्स दिन विशेष: मुंबईकरांची एचआयव्हीला टक्कर, प्रमाण 56 टक्क्यांनी घटलं!Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement