हीच खरी शहिदांना श्रद्धांजली !

कुलाबा - फक्त 16 वर्षाच्या अधिराजचे सामाजिक भान थक्क करणारं आहे. हुतात्मा सैनिकांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी तो धडपडतोय. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या 19 जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च अधिराज उचलणार आहे. अभिराजने व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती केली. त्याच्या या उपक्रमात साथ देणारे हातही आता पुढे येऊ लागलेत.

अभिराजला घरच्यांचाही ठाम पाठिंबा आहे. अभिराजचा लहान भाऊ विराज ठाकूरने जनजागृती करण्यासाठी प्रेझेंटेशनही बनवले आहे. याद्वारे त्याने शाळांमध्येही हा उपक्रम पोहोचवला. अभिराजची आई रुचिका ठाकूर यांना आपल्या दोन्ही मुलांच्या कर्तृत्वावर अभिमान आहे.

उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक यावरून राजकारण रंगलंय. या पार्श्वभूमीवर या तरूणाची ही संवेदनशीलता मनाला नक्कीच भिडणारी आहे.

Loading Comments