11 स्पर्धक रुग्णालयात दाखल

 Pali Hill
11 स्पर्धक रुग्णालयात दाखल
11 स्पर्धक रुग्णालयात दाखल
11 स्पर्धक रुग्णालयात दाखल
See all

मुंबई - मॅरेथॉनचा आनंद रविवारी सकाळी हजारो मुंबईकरांनी घेतला असतानाच या स्पर्धेतील 11 धावपटूंना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील बहुतांश जणांना डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला होता. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी सहा जणांना बॉम्बे रुग्णालयात, 2 जणांना हिंदूजा रुग्णालयात, दोघांना लिलावतीत आणि एकाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश धावपटूंना स्नायू पेटके, डीहायड्रेशन, पाय मुरगळणे तसेच मळमळण्याचा त्रास झाला. स्पर्धेतील अन्य सात धावपटूंना डीहायड्रेशनचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना मेडिकल कॅम्पमध्ये फ्लड थेरपी देण्यात आली. या सर्वांना एशियन हार्टच्या स्वयंसेवकांनी मॅरेथॉनमधून रुग्णालयात दाखल केले. यंदा हृदय प्रत्यारोपण केलेल्या 85 रुग्णांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. 

Loading Comments