Advertisement

डब्ल्यूअायएए महिला रॅलीत १७४ कारचा समावेश


डब्ल्यूअायएए महिला रॅलीत १७४ कारचा समावेश
SHARES

रविवारी २५ मार्च रोजी मुंबईतल्या एनएससीअाय स्टेडियम इथून सुरू होणाऱ्या १०व्या महिला कार रॅली अाॅफ द व्हॅली शर्यतीत तब्बल १७४ कार सहभाग होणार अाहेत. या स्पर्धेत ड्रायव्हर्स अाणि नेव्हिगेटर्ससह तब्बल ६९६ महिला सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत अाणखीनच वाढवणार अाहेत. खास महिलांसाठी असलेल्या या शर्यतीचं अायोजन वेस्टर्न इंडिया अाॅटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूअायएए) अाणि लवासा सिटी यांच्या सहकार्याने केलं जातं.


या शर्यतीच्या गेल्या नऊ मोसमात पारुल शाह या सहभागी झाल्या होत्या. एकदा त्यांनी विजेतपदही पटकावलं अाहे. या वर्षीही या शर्यतीत सहभागी होण्यासाठी त्या उत्सुक अाहेत. या कार रॅलीमध्ये सहभागी होण्याची एक वेगळीच मजा असते. फक्त वेगाने गाडी चालवणं, इतकंच थ्रील या स्पर्धेत नसतं तर वेगावर नियंत्रण राखणं अाणि वेळ पाळणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. जर वेगाने गाडी चालवली अाणि निर्धारित वेळेच्या अात अंतिम ठिकाण गाठलं तर चालकाला दंडही भरावा लागतो अाणि त्याचे गुणही कमी होत जातात. त्यामुळे वेळ पाळणं सर्वात महत्त्वाचं अाहे, असं पारुल शाह यांनी सांगितलं.२२५ किमी.ची शर्यत

महिलांसाठी २२५ किलोमीटर असलेल्या या शर्यतीत विजेत्याला एक लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल. उपविजेता ७५ हजार रुपयांचा मानकरी ठरेल. तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर सर्वोत्तम रंगवलेली कार, सर्वोत्तम कपडे परिधान केलेल्या महिला, सर्वोत्तम संदेश देणारी कार, तसेच सर्वोत्तम थीम असलेली कार, सर्वोत्तम स्लोगन असलेली कार, सर्वोत्तम हौशी टीम, वयस्कर सहभागी स्पर्धक तसंच फेसबुकवरील सर्वोत्तम लोकप्रिय टीम अशा सर्वांना बक्षिसं दिली जाणार अाहेत.संदीप पाटील यांच्या हस्ते सुरुवात

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, लवासा सिटीचे सीईअो प्रवीण सूद अाणि डब्ल्यूअायएएचे कार्यकारी अध्यक्ष नीतिन डोसा यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात होईल. एनएससीअाय स्टेडियम इथून रविवारी सकाळी ६.३० वाजता शर्यतीला सुरुवात होईल. त्यानंतर हाजीअली, पेडर रोड, चौपाटी, मरीन ड्राइव्ह, चर्चगेच या मुंबईतील एेतिहासिक स्थळांना भेट देऊन ही रॅली लवासा सिटीच्या दिशेने मार्गक्रमण करेल.


हेही वाचा -

महिला कार रॅलीत ८०० स्पर्धकांचा समावेश

संबंधित विषय
Advertisement