अजिंक्य काप्रे बनला यु मुंबा फ्यूचर स्टार

 Mumbai
अजिंक्य काप्रे बनला यु मुंबा फ्यूचर स्टार
अजिंक्य काप्रे बनला यु मुंबा फ्यूचर स्टार
अजिंक्य काप्रे बनला यु मुंबा फ्यूचर स्टार
See all

परळ - होंडा सीबी हॉर्नेट 160 आर यु मुंबई फ्यूचर स्टार्सचा नॉक आऊट राऊंड रविवारी 26 मार्चला झाला. महर्षी दयानंद कॉलेज आणि रामानिजन झुनझुनवाला कॉलेज या दोन संघामध्ये एक रोमांचक सामना खेळला गेला. जो 46-25 या पॉईंटने संपन्न झाला.

महर्षी दयानंद कॉलेजने इंदिरा गांधी कॉलेजला सेमी फायनलमध्ये 51-43 ने हरवून रामानिंदर झुनझुनवाला कॉलेजसोबत फायनल मध्ये आपली जागा निश्चित केली.

श्रमिक जिमखाना मध्ये आयोजित केलेल्या कबड्डीच्या सामन्याला कबडडी रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भारत आणि यु मुंबाचा कर्णधार अनुपकुमार , ऋषंक देवदीग, विशाल माने तसंच यु मुंबा संघाचे कोच इ.भास्करन यांनी उपस्थिती दर्शवली.

तृषांक रोठेची होंडा सीबी हॉर्नेट 160 स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलं आणि बक्षीस म्हणून एक बाईक दिली गेली. तसंच तृषांकला फ्यूचर स्टार अजिंक्य काप्रेसोबत यु मुंबा संघात प्रशिक्षण घेण्याची संधी देखील मिळाली.

Loading Comments