Advertisement

क्रिकेट आणि कुस्तीनंतर आता आमिर खेळतोय टेबल टेनिस!


SHARES

बॉलिवूडमध्ये खेळांवर आधारीत सर्वाधिक चित्रपट कोणत्या अभिनेत्याने केले आहेत? असा प्रश्न उपस्थित झाल्यास परफेक्शनिस्ट आमिर खानचे नाव सहजपणे डोळ्यापुढे येते. 'जो जीता वही सिकंदर'मध्ये जिद्दीने सायकल स्पर्धा जिंकणारा, 'लगान'मध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून ब्रिटिशांवर मात करणारा आणि 'दंगल'मध्ये कुस्तीपटू पित्याची भूमिका साकारुन मुलींना खेळासाठी प्रोत्साहित करणारा, अशा आमिरच्या सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांवर गारुड केले. सामान्य प्रेक्षकांसोबतच खेळाडूंनाही प्रेरीत करणारा आमिर आता नव्या खेळाच्या प्रेमात पडलेला दिसतोय. हा खेळ आहे टेबल टेनिस!

भारतात पहिल्यांदाच 'अल्टिमेट टेबल टेनिस लीग' सुरू होत असून आमिर या लीगला प्रमोट करत आहे. या लीगचा प्रोमो नुकताच सादर झाला आहे. त्यात आमिर टेबल टेनिसचे कौशल्य पणाला लावत त्याच्याइतक्याच प्रतिभावान स्पर्धकावर मात करताना दिसत आहे. हा प्रतिस्पर्धी कोण? असा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तरही सोपे आहे. आमिरचा स्पर्धक आमिरशिवाय दुसरा कोण असू शकतो?

मी अनेक खेळांवर आधारीत चित्रपटांत काम केले आहे. त्यातून मी एक अशी गोष्ट शिकलो की, जोपर्यंत मला तो खेळ पूर्ण कौशल्याने खेळता येत नाही, तोपर्यंत मी माझ्या भूमिकेशीही समरस होऊ शकत नाही. अभिनय जिवंत वाटण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

आमिर खान, अभिनेता

येत्या 13 जुलैपासून सुरू होत असलेली 'अल्टिमेट टेबल टेनिस लीग' स्पर्धा दिल्ली, मुंबई आणि चेन्नई अशा तीन शहरांत होणार आहे.हेही वाचा

आमिरचा फॅट टू फिट प्रवास...

पाकिस्तानात 'दंगल' टाळणाऱ्या आमिरचं विधानपरिषदेत कौतुक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement