भारत - ऑस्ट्रेलिया सराव सामना मुंबईत

 Mumbai
भारत - ऑस्ट्रेलिया सराव सामना मुंबईत
Mumbai  -  

चर्चगेट - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 4 मॅचची टेस्ट सिरीज 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाला भारत अ संघासोबत खेळावं लागणार आहे. आशियामध्ये 9 टेस्ट मॅच हरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला ही मालिका जिंकणे मोठे आव्हान असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 4 सामन्यांची मालिका पुणे, बंगळुरू, रांची आणि धर्मशाळामध्ये खेळविली जाणार आहे. त्याआधी मुंबईमध्ये भारत अ सोबत ऑस्ट्रेलियाचा सराव सामना होणार आहे. भारत अ संघाचं नेतृत्व हार्दीक पंड्या करणार आहे.

या संघात रणजीमध्ये गुजरातकडून खेळणारा प्रियांक पांचाल देखील खेळणार आहे. राहुल सिंह, विकेटकिपर रिषभ पंत, महाराष्ट्राचा अंकित बाबने, चायनामॅन कुलदीप यादव आणि रणजीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शाहबाज नदीम याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Loading Comments