बाळकृष्ण बापट स्मृती चषकमध्ये प्रभू जॉली अव्वल

Churchgate
बाळकृष्ण बापट स्मृती चषकमध्ये प्रभू जॉली अव्वल
बाळकृष्ण बापट स्मृती चषकमध्ये प्रभू जॉली अव्वल
See all
मुंबई  -  

चर्चगेट - येथील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या बाळकृष्ण बापट स्मृती चषक स्पर्धेत प्रभू जॉली संघांने बाळकृष्ण बापट स्मृती चषकावर आपले नाव कोरले. 4 गडी आणि 1 षटक राखत खंडाळा स्पोर्ट्स क्लब संघाला हरवून त्यांनी हा विजय मिळवला.

विशेष म्हणजे खंडाळा स्पोर्ट्स क्लब या संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही आहे. या सामन्यात अर्जुनने गोलंदाजी करताना प्रभू जॉली संघाच्या धावा रोखण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात प्रभ जॉली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खंडाळा स्पोर्ट्स क्लबने फलंदाजी करताना पहिल्या 5 षटकांतच 35 धावा केल्या. पण तोपर्यंत त्यांचे दोन खेळाडू बाद झाले होते. नंतरच्या षटकांमध्ये अडखळत का होईना खंडाळा स्पोर्ट्स क्लबने 134 धावांचे आव्हान दिले.

प्रभु जॉलीच्या फलंदाजीची सुरुवात उत्तम झाली. अवघ्या पहिल्या 4 षटकांत तीसीचा आकडा या संघाने पार केला. पण पुढील दुसऱ्या षटकातच त्यांचा एक गडी बाद झाला. पण नंतर झालेल्या षटकांमध्ये सहज 100 चा आकडा प्रभू जॉलीने पार केला. या सामन्यात रविंद्र विश्वकर्मा या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला. याने संपूर्ण मॅचमध्ये 56 धावा अवघ्या 35 चेंडुत केल्या. तर दोन झेलही रविंद्रने टिपले. प्रभू जॉली संघ या सामन्यात विजयी ठरला असून खंडाळा क्रिकेट क्लबला पराभव स्विकारावा लागला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.