चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचा थरार

 Borivali
चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचा थरार
चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचा थरार
चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचा थरार
See all
Borivali, Mumbai  -  

बोरिवली - चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं लाल मैदानात चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुंबई महिला पोलीस जिमखाना संघानं गोल्फादेवी संघावर 56-17 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. आरती नार्वेकर, भक्ती इंदुलकरच्या खोलवर चढायांनी गोल्फादेवीच्या बचाव फळीला खिंडार पाडलं.

दुसरीकडे, पुरुषांमध्ये न्यू इंडिया अश्योरन्स संघानं विजयी कूच करताना मध्य रेल्वे डिव्हीजनचा पराभव केला. इंडिया अश्योरन्स संघानं 9 गुणांनी बाजी मारली. शिशीर पवार, समीर यांनी शानदार खेळ करताना संघाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. त्याचप्रमाणे, महिलांच्या अन्य एका सामन्यात अनपेक्षित निकाल लागला. अमरहिंद मंडळ संघानं बलाढ्य डॉ. शिरोडकर संघाला २९-१८ असा धक्का दिला. दिप्ती पारकर, प्रियांका कोटेकर यांच्या आक्रमक चढाया निर्णायक ठरल्या. तर, प्राजक्ता कांबळी, तेजस्विनी पोटे यांनी मजबूत पकडी करताना शिरोडकर संघाचे आव्हान संपुष्टात आणले.

Loading Comments