Advertisement

आता ऑनलाईन कॅरम चॅलेंज, २५ जूनपासून जागतिक स्पर्धेचं आयोजन

कोरोनामुळं बुद्धिबळाच्या ऑनलाईन स्पर्धा वाढल्या आहेत. अशातच आता कॅरमची ऑनलाईन चॅलेंजर स्पर्धा होणार आहे

आता ऑनलाईन कॅरम चॅलेंज, २५ जूनपासून जागतिक स्पर्धेचं आयोजन
SHARES

जीवघेण्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी घरी राहणं पसंत केलं आहे. मागील अनेक दिवस घरी राहिल्यानं नागरिकांनी वेळ जावा यासाठी ऑनलाइन खेळांना अधिक पसंती दिली आहे. कोरोनामुळं बुद्धिबळाच्या ऑनलाईन स्पर्धा वाढल्या आहेत. अशातच आता कॅरमची ऑनलाईन चॅलेंजर स्पर्धा होणार आहे. गुरूवारपासू या कॅरमच्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तसंच, ही स्पर्धा या वेगळ्याचं नियमानं होणार असून, या चॅलेंजमध्ये १.४ लाखाची बक्षिसं असणार आहेत.

या स्पर्धेत पारंपरिक कॅरमप्रमाणं स्पर्धक एकमेकांविरुद्ध लढणार नाहीत; पण त्यांच्यात विजेतेपदासाठी नक्कीच कडवी चुरस होणार आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विजेत्यास ३० हजारांचं बक्षीस मिळणार आहे. तसंच, महिला एकेरीतील विजेत्यास २० हजाराचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेवर भारतीय खेळाडूंची हुकुमत असल्यामुळं युरोप, अमेरिका आणि आशियातील अव्वल खेळाडूना १० हजाराचं खास पारितोषिक असणार आहे.

कॅरमच्या स्पर्धेत ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिशद्वारे खेळाडूचं कौतुक होतं. आता नेमका हाच निकष मानून स्पर्धा होत आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही चुरस असणार आहे. पारंपरिक कॅरम लढतीप्रमाणंच स्पर्धत ८ बोर्डचं आव्हान असणार आहे. ४ दिवस होणाऱ्या या स्पर्धेत सुरुवातीस कोणीही बाद होणार नाही. मात्र चौथ्या दिवशी अखेर सर्वाधिक गुण असलेले ४ खेळाडू निवडले जातील आणि त्यानंतर त्यांच्यात उपांत्य आणि अंतिम लढती होणार आहे.

या चॅलेंजमधील भारतीय खेळाडूंसाठी संध्याकाळी ७ ते ९ ही वेळ आहे. युरोप, अमेरिका तसंच, अन्य देशातील स्पर्धकांसाठी त्यांच्या सोयीची वेळ देण्यात आली आहे. सुहास कांबळी, मारिया इरुदीयम आणि अरुण केदार हे या चॅलेंजसाठी पंच असणार आहेत.

चॅलेंजचं स्वरूप

  • स्पर्धक पारंपरिक पद्धतीनं खेळण्यास सुरुवात करतील.
  • स्पर्धक सुरुवातीस पांढऱ्या सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर काळ्या.
  • ब्रेक टू फिनिश झाल्यास स्पर्धक ब्लॅक टू फिनिशचा प्रयत्न करणार.
  • ब्रेक टू फिनिश केल्यास ५ गुण, तर ब्लॅक टू फिनिश केल्यास ३ गुण.
  • ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश एकाच बोर्डवर केल्यास अल्टिमेट स्लॅमसाठी १० गुण.
  • पांढरी सोंगटी चुकल्यास, काळ्या सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करायचा. याच क्रमानं सर्व सोंगट्या जाईपर्यंत खेळायचं.
  • पांढऱ्या तसंच काळ्या सोंगट्या एकाच प्रयत्नात न घेतल्यास, त्या पुढील प्रत्येक प्रयत्नासाठी १ दंड गुण.



हेही वाचा -

‘इस्रो सायबरस्पेस’ घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा