तामिळनाडूच्या मुथैयाने तजाकिस्तानच्या ग्रँड मास्टरला रोखले

 Bandra
तामिळनाडूच्या मुथैयाने तजाकिस्तानच्या ग्रँड मास्टरला रोखले
Bandra, Mumbai  -  

दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या मुथैया अलने तजाकिस्तानचा ग्रँड मास्टर अमोनातोव्ह फारुखला बरोबरीत रोखले. तर दुसऱ्या टेबलवर भारताचा ग्रँड मास्टर आणि द्वितीय मानांकित दिप्तायण घोषने तामिळनाडूच्या कार्तिक वेंकटरमणचा शेवटच्या क्षणी पराभव केला. वांद्रे येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशन स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. या बुद्धिबळ स्पर्धेत भारतासह 14 देशांच्या नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पहिल्या टेबलवर डावाची सुरुवात मुथैया अलने घोड्याच्या चालीने केली आणि सामना किंग्ज इंडियन डिफेन्स पद्धतीमध्ये रुपांतरीत झाला. 30 व्या चालीला सर्व सोंगट्यांची अदलाबदल होऊन पटावर दोन हत्ती आणि वेगळ्या रंगाचे उंट राहिले.

अखेर 40 व्या चालीला दोघांनी सामना बरोबरीत सोडवून दुसऱ्या फेरीनंतर 1.5 गुणांची कमाई केली.

Loading Comments