• युवराज सिंगविरोधात कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल
SHARE

भारतीय क्रिकेट टीममधील बॅट्समन युवराज सिंगविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये युवराज सिंगसोबतच त्याची आई शबनम सिंग आणि भाऊ जोरावर सिंग यांचाही समावेश आहे. युवराज सिंगची वहिनी आकांक्षा शर्माने तक्रार दाखल केली आहे. आकांक्षा शर्मा याआधी बिग बॉस या टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या प्रकरणी येत्या 21 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याचं आकांक्षाच्या वकील स्वाती मलिक यांनी सांगितलं आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?

स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार स्वातीने सांगितलं की याआधी युवराज सिंगची आई शबनमने आकांक्षाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी लग्नात देण्यात आलेले दागिने आणि इतर मौल्यवान सामान परत मागितलं होतं.


युवराजविरोधात गुन्हा का?

युवराजविरोधातील तक्रारीबाबत सांगताना स्वाती म्हणाल्या की, 'कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ शारिरीक हिंसा होत नाही. याचा अर्थ मानसिक आणि आर्थिक त्रासही होतो. आकांक्षावर अन्याय होत असताना युवराज सिंगने काहीच भूमिका घेतली नाही. शिवाय आई शबनम आणि भाऊ जोरावर आकांक्षावर मूल जन्माला घालण्यासाठी दबाव टाकत होते, तेव्हा युवराजनेही तिच्यावर दबाव टाकला. त्यामुळे त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'कोण आहे आकांक्षा शर्मा?

आकांक्षा शर्माने बिग बॉसच्या 10व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या सीझनदरम्यान सुद्धा आकांक्षा शर्माने युवराज सिंगवर वेगवेगळे आरोप केले होते. शिवाय त्याच्याविरोधात काही पुरावेही दिल्याचं बोललं जात होतं. एका मुलाखतीदरम्यान तर आपण युवराजला गांजा पिताना पाहिल्याचा दावाही तिने केला होता.हेही वाचा

क्रिकेटचा 'गाॅड' आता काॅमिकचा 'हिरो'!


संबंधित विषय
ताज्या बातम्या