अंतिम सामना कांदीवली सीए विरुध्द योगी सीसीमध्ये

  Azad Maidan
  अंतिम सामना कांदीवली सीए विरुध्द योगी सीसीमध्ये
  मुंबई  -  

  मुंबई - सोमवारी झालेल्या आझाद मैदानात गोरधनदास उपनगर शिल्ड क्रिकेट टुर्नामेंटमधील उपांत्यफेरीत कांदिवली क्रिकेट असोसीएशन विरुद्ध अवर सीसी या दोन टीमच्या सामन्यात अवर सीसी ला 4 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. योगेश पुजारीने नाबाद 72 धावांची खेळी करुन आपल्या टीमला उपांत्य फेरीत विजय मिळवून दिला. 20 षटकांच्या या सामन्यात कांदीवली क्रिकेट असोसीएशनची टीम विजयी झाली. 

  विजयात खरं योगदान होतं ते सुशांत मांजरेकर, अमित राठोड आणि दुशन कदम यांचे. या तिघांनी 6 षटकार मारुन विजयाचा पाया रोवला. तसेच पुजारी आणि कर्णधार उमंग शाह या दोघांनी उत्कृष्ट अशी खेळी करत स्कोअर बोर्ड हलता ठेवला. प्रत्येक षटकात 5-6 धावांची सरासरी ठेवत 19.3 षटकात तिस-या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. तर पुजारीने 7 चौकार मारुन 72 धावांची खेळी केली. दुस-या उपांत्य फेरीत खार जिमखान्याने 6 बाद 140 धावा केल्या. तर प्रियांक शेट्टीने 74 धावा करत उत्कृष्ट खेळी केली. योगी सीसीचे फलंदाज रवींद्र विश्वकर्मा यांनी नाबाद 72 धावा करत आपल्या संघाला विजयी केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.